रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथे सिलिंडरचा स्फोट, घरातील लोक जखमी
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथे सिलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची दुर्घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली.या स्फोटामुळे घराला आग लागली असून, घराचा काही भाग कोसळला आहे.
सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने आग लागल्याचे बोलले जात आहे. बुधवारी पहाटे अवघ्या काही मिनिटांत आगीने रुद्रावतार धारण केला. या घरात पाच जण राहत होते. त्यातील तिघे जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य दोन जण घरात अडकल्याची भीती आहे. या दोघांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ मदत करत आहेत. पोलrस यंत्रणाही घटनास्थळी पोहोचली असून, बचावकार्य सुरू आहे.
या स्फोटाचा आवाज सर्वत्र ऐकू आला
www.konkantoday.com