मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना लाईफ ऑक्सीजन एफ. सी. आय. गोडावून एक्सॉटिक फूड प्रा. लि. कंपनी यश हॉटेल 100 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद

* रत्नागिरी, दि. 3 : उद्या मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकररिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना लाईफ ऑक्सीजन एफ. सी. आय. गोडावून एक्सॉटिक फूड प्रा. लि. कंपनी यश हॉटेल असे 100 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्यात येत असल्याबाबतची आदेश मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 प्रमाणे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी एफ. सी. आय. गोडावुन, एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे होणार आहे. मतमोजणी दरम्यान मतमोजणी परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असुन, अशा वेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता दि 4 जून रोजीसकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना लाईफ ऑक्सीजन एफ. सी. आय. गोडावून एक्सॉटिक फूड प्रा. लि. कंपनी यश हॉटेल असे 100 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून 1 ) लाईफ ऑक्सीजन मार्गे येणारी वाहने नवनिर्माण कॉलेज जिलानी मरीन कंपनी नवलाई आर. एम. सी. प्लॅन्ट 2) यश हॉटेल मार्गे येणारी वाहने नवलाई आर. एम. सी प्लॅन्ट जिलानी मरीन कंपनी नवनिर्माण कॉलेज या पर्यायी मार्गाने ‘वाहतूक वळविण्यात यावी. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button