रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करा : राष्ट्रवादीची मागणी

रत्नागिरी : शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामाची त्रयस्थ तांत्रिक संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून कंस्ट्रक्शन कंपनीने केेलेल्या या योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.  शहरातील नळपाणी योजनेचे काम कार्यारंभ आदेशापासून 2 वर्षात पूर्ण करायचे होते. परंतु 5 वर्षे होत आली तरी कामे सुरुच आहेत. झालेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आहेत. जलवाहिनी साडेचार फूट खोल असणे आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी ती 2 फुटांवर  आहे. जलवाहिनीचा दर्जा योग्य नसल्याने वेळोवेळी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे, असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button