
आजारपणाला कंटाळून तुरंबव येथे वृद्धेची आत्महत्या
चिपळूण : आजाराला कंटाळून तुरंबव हवालदारवाडी येथे एका 66 वर्षीय वृद्धेने ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून पेटवून घेतले. यात या महिलेचा मृत्यू झाला. सुषमा दत्ताराम पंडित असे या वृद्धेचे नाव आहे. ही घटना दि.15 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. पंडित या दोन वर्षे आजारी होत्या. त्यांना अधूनमधून फीट येत असे. आत्महत्या केल्यानंतर उपचारासाठी दाखल केले असता सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांना त्यांना मृत घोषित केले.




