सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत व्यापक बदल होण्यासाठी राज्य स्तर जनजागृती मोहीम -विकास शेट्ये
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत व्यापक बदल होण्यासाठी राज्य स्तर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मंडणगड येथील ज्येष्ठ पत्रकार विकास मधुकर शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना देण्यात आले.
वैयक्तीक विचारांपेक्षा सार्वजनिक विचारधारेवर निवडणूक असावी. अयोग्य लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याची कायद्यात तरतूद असावी. किमान ३५ टक्के मते मिळवून विजयी झालेल्या लोकप्रतिनिधी असावा, अशा तीन प्रमुख मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे श्री. शेट्ये यांनी सांगितले. सदर मोहिमेचा शुभारंभ बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना निवेदन देवून करण्यात आला आहे.
लोकशाहीत लोकप्रतिनिधींची बहुमतनाने निवड करण्याचा अधिकार आहे. परंतु बहुमताने त्याला परत बोलविण्याचा अधिकार नाही. २५ ते २६ टक्क जनाधार असला तरीही बहुमताच्या जोरावर लोकप्रतिनिधींची निवड केली जाते उरलेल्या ७० ते ७५ टक्के लोकांना पटत नसलेले नेतृत्व स्विकारावे लागते. निवडून गेलेला प्रतिनिधी २५ ते २६ टक्के लोकांना न जुमानता आपला निर्णय घेतो. ही प्रक्रिया पूर्णतः चुकीची असल्याचे विकास शेट्ये यांनी सांगितले. आपल्याला विचारधारा टिकवून विचारधारेचा प्रतिनिधी द्यावा लागेल. ज्या संघटनेच्या विचारधारेतून नेतृत्व तयार होईल त्याला त्या संघटनेच्या विचारधारेप्रमाणे काम करावे लागेल असे मत श्री. शेट्ये यांनी व्यक्त केले. www.konkantoday.com