भरणे येथे कारच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी
खेड: मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी दि.11 रोजी 11.15 वाजण्याच्या सुमारास कारची धडक बसून पादचारी गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील भरणे जाधववाडी येथे ही घटना घडली. पुण्याहून दापोलीच्या दिशेने जाणार्या कारने (एम एच12, एच एन 0072) रस्ता ओलांडत असणार्या काशिनाथ विष्णू ढसाळ यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी काशिनाथ यांना घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.