चिपळूणमध्ये बनावट सोने देणार्‍या बंगाली व्यावसायिकाला दिला चोप

चिपळूण : पैशांसाठी एका बँकेत सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी भर बाजारपेठेत घडला. ओळखीचा फायदा घेत एका महिलेमार्फत ते खोटे दागिने बँकेत ठेवण्यासाठी देणार्‍या बंगाली व्यावसायिकास स्थानिकांनी भर बाजारपेठेत चांगलाच चोप दिला . याबाबत त्याला प्रसाद देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. शहरात दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरू होती.
सोमवारी सकाळी एक महिला सोन्याचे बनावट दागिने घेऊन शहरातील चिंचनाका परिसरातील एका बँकेत गेली. ते दागिने तारण ठेवायचे असल्याचे बँकेतील अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर ते दागिने बँकेच्या सोनाराने पाहिले. यावेळी त्याला ते दागिने खोटे असल्याचा संशय आला. त्याने त्या दागिन्यांची तपासणी करताच ते खोटे असल्याचे निदर्शनास आले.  त्या खोट्या दागिन्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने सांगत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.
बँकेत खाते असल्याने ते दागिने तिच्या ओळखीतील एका बंगाली सोनाराने बँकेत ठेवण्यासाठी दिल्याची माहिती तिने दिली. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेमार्फत त्या बंगाली व्यावसायिकाला तेथे बोलविण्यात आले. तो येताच संतप्त नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्याला पकडून रस्त्यावरून घेऊन जाताना बघ्यांची गर्दी जमली होती.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button