गणपतीपुळे येथे अंगारकीला ६० ते ७० हजार गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता.२०२३ या वर्षात एकमेव अंगारकीचा योग असल्यामुळे घाटमाथ्यावरील सुमारे ६० ते ७० हजार गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे गणपतीपुळे येथील वातावरण भक्तिमय बनले होते. पहाटेपासूनचश्री दर्शनासाठी लांब रांग लागली होती.
गणेशभक्त मोठ्या प्रमाणात येणार अशी अटकळ आधपासूनच होती. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत, संस्थान श्री देव गणपतीपुळे व पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून दर्शनासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. मंगळवार दि.१० जानेवारी रोजी पहाटे तीन तीस वाजता मुख्य पुजारी अमित घनवटकर व सहकारी ब्राह्मणवृंद यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या अंगारकी यात्रा उत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, मिरज आदींसह मुंबई, पुणे येथील गणेश भक्त गणपतीपुळे तीर्थक्षेत्री सोमवारी सायंकाळपासूनच गणपतीपुळे येथे दाखल झाले होते.
गणेश भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शन लाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीमार्फत आलेल्या वाहनांची सागरदर्शन पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. , मंदिर परिसर, एसटी बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यांमधे सुमारे बावीस अधिकारी,१७५ पोलीस कर्मचारी व ३० राखीव पोलीस दलाचे जवानांनी मोठी मेहनत घेतली.
तसेच दर्शन लाईन मधून गणेशभक्तांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता पोलीस कर्मचारी यांचेसह रत्नागिरी येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे सुमारे ५० स्वयंसेवकांनी आपली कामगिरी चोख बजावली.तर आलेल्या गणेशभक्तांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ औषधोपचार मिळावेत यासाठी मंदिर परिसरात मालगुंड येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय धारिया , समुदाय अधिकारी डॉ. सय्यद आसिफ, आरोग्यसेवक एम.डी.सातव व कर्मचारी यांची टीम तैनात करण्यात आली होती.या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील गणेशभक्तांनी श्रींची पालखी हारफुलांनी अतिशय आकर्षकरित्या सजवली होती.
यावेळी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत ढोल ताशांच्या गजरात व चोख पोलीस बंदोबस्तात पालखी प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा पार पडला. हा अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती , गणपतीपुळे ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणा यांनी विशेष मेहनत घेतली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button