
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आशिष नेहरा याने केले रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे कौतुक
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आशिष नेहराने रत्नागिरीला भेट दिली. यावेळी ओम साई स्पोर्टस क्लबच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरामध्येही रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीसारखी टेनिस बॉलवरील मोठी स्पर्धा आयोजित होत असल्याचे पाहून नेहरा याने या स्पर्धेचे व आयोजकांचे कौतुक केले. ओमसाई स्पोर्टस क्लबचे रजनीश परब व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक महेश सामंत यांनी ही भेट घेतली.
रत्नागिरीत ओमसाई स्पोर्टस क्लबच्यावतीने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 16 जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले आहे. मागील नऊ वर्षापासून या स्पर्धेने महाराष्ट्रासह देशातील क्रीडारसिकांना व क्रिकेटपटूंना भुरळ घातली आहे. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होणारे व्यासपीठ याची माहिती यावेळी रजनीश परब व महेश सामंत यांनी यावेळी दिली.