संगमेश्वर तालुक्यातील 328 जनावरांनी लम्पी रोगावर मात केली
संगमेश्वर : तालुक्यात लंपी रोगाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तालुक्यात सध्या 192 जनावरे उपचाराखाली असून, 328 जनावरांनी रोगावर मात केली आहे. तालुक्यात 574 जनावरे लंपी रोगाने बाधित झाली. यातील 52 जनावरे दगावली. तालुक्यात लसीकरण 90 टक्के झालेले असल्याने रोगाने बाधित होऊनही मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. बाधित जनावरांची शेतकरी यांनी काळजी घ्यावी. जनावरांना भरपूर पाणी पिण्यास द्यावे. या पाण्यात गुळ व मीठ टाकावे. जनावरांना चांगला आहार द्यावा. कडुलिंबूच्या पाल्याची धुरी गोठ्यात करावी जेणेकरून गोचीड व गोमाशी यांपासून जनावरांचे संरक्षण होईल, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी पी. डी. पवार यांनी केले आहे.