
रायपाटण येथे शेकोटी घेत असताना वृद्धेच्या साडीने घेतला पेट
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथे शेकोटी घेताना वृद्धा भाजली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भागीरथी शिवराम पवार (72, रा.कर्जलवाडी रायपाटण ) असे तिचे नाव आहे. सोमवार 9 जानेवारी रोजी सकाळी 6 वा. सुमारास भागीरथी पवार घराच्या जवळ शेकोटी घेत असताना त्यांच्या अंगावरील नायलॉन साडीने पेट घेतला. भागीरथी पवार अंदाजे 45 ते 50 टक्के भाजल्या असून याची नोंद पोलिस चौकीत करण्यात आली आहे.