देवरूख बाजारपेठेमध्ये मध्यरात्री आगीचे तांडव; तीन दुकानांचे साहित्य जळून खाक, आगीत अडकलेल्या दोघांना वाचवले

देवरूख : रविवारी मध्यरात्री
आगीचे तांडव देवरुख शहरात घडले. शहरातील तीन दुकाने शाॅटशर्किटमुळे आग लागून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग बेकरीतील फ्रीजरमधील बिघाडामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नागरिकांनी धाडस दाखवत बेकरीमधील दोन जणांना सुखरुप बाहेर काढले. भाजीपाला दुकान, किराणा माल, बेकरी अशा तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री १२. ३० च्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच आग विझवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. बेकरीतील पदार्थ, भाजी दुकानातील क्रेट यांनीही पेट घेतला. यातून आगीच्या ज्वाळा प्रवीण पागार यांच्या किराणा दुकानाला पोहोचल्या. दुकानातील तेल कॅन व किराणा मालही पेटला. अबीर मेडिकलमध्ये ही आग जाऊ नये यासाठी नागरिकांनी किराणा दुकानाचे व मेडिकलचे छप्पर उडवले आणि आग तीन दुकानापुरतीच राहिली.
बेकरीचे मालक अंबरीश चौधरी व त्यांचा कामगार आगीवेळी बेकरीतच होते. ही बाब नागरिकांना समजताच बेकरीमागील खिडकी तोडून या दोघांना बाहेर काढले.
भाजी दुकान हे दीपक येडगे यांचे होते. यादुकानातील कॅश सुमारे २२ हजार व महत्वाचे मूळ कागदपत्रे जळून खाक झाले. प्रवीण पागार यांच्या किराणा दुकानाचे नुकसान झाले.
देवरुखमध्ये अग्निशमन बंब नसल्याने तीन दुकानाला याचा फटका बसला आहे. यापूर्वी अशा पाच घटना घडल्या. त्यामुळे नगर पंचायतीला आता तरी अग्निशमन बम्ब शासनाकडून मिळावा, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button