
कोकणातील साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र फलोत्पादनाखाली; रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यवाही
रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कोकण किनारपट्टी भागात असेलल्या फलोत्पादन जिल्ह्यात अन्य विभागांच्या तुलनेत विक्रमी फळबाग लागवड करण्यात आली आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांत या योजनेला प्रतिसाद देताना सुमारे साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश आले आहे. ठाणे जिल्ह्यात या योजने 100 टक्के सहभाग घेतला असून, फलोत्पादन म्हणून लौकिक असलेल्या रत्नागिरीत मात्र केवळ 37 टक्के क्षेत्रात ही योजना राबविण्यात आली आहे. त्यातुलनेने शेजारील सिंधदुुर्ग जिल्ह्यात या योजनेत 50 टक्के क्षेत्र लागवडीखाली आणण्यात यश आले आहे.
कोकणातील अडीच हजार कृषी सहायकांच्या सहकार्याने या योजनेत कोकणातील शेतकर्यांना प्राधान्याने सहभागी करुन घेण्यात आले होते. प्रत्येक कृषी सहायकाला उद्दिष्ट निश्चित करून दिल्याने मार्च अअखेर कृषी विभागाने ठरलेल्या उद्दिष्टानुसार फळबाग लागवड पूर्ण करण्याचा प्रयत्न आता कृषी विभागाकाडून सुरू करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात एक हजार 80 हेक्टर क्षेत्रात ही लागवड 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्यात 2102 हेक्टर क्षेत्रावर 78 टक्के लागवड पूणर्र् करण्यात आली आहे तर रायगड जिल्ह्यात 1998 हेक्चर क्षेेत्रात 78 टक्के पूर्ण करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र केवळ 37 टक्के लागवड पूर्ण करण्यात आली असून आतापर्यंत 1799 हेक्टर क्षेत्रात काजू आणि आंबा लागवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1650 हेक्टर क्षेत्रात 50 टक्के लागवड पूर्ण करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह यामध्ये पिछाडीवर आहे.