आगरनरळ येथील अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणार्‍याला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : आगरनरळ येथील अल्पवयीन मुलीशी ओळख करून गैरफायदा घेणार्‍या संशयिताला न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रणेश बाळकृष्ण गाडे (वय 34, रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याने 2 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीशी  शारीरिक संबंध ठेवले होते. याप्रकरणी तिने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रणेशला पोलिसांनी अटक केले. न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी पोलिस कोठडी संपली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button