
चिपळूण मिरजोळीतील खड्डे अखेर भरले
चिपळूण : मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील बायपास ते साई मंदिर या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. चिपळूण-गुहागर-विजापूर मार्गावरील हे खड्डे आता भरण्यात आले आहेत. मिरजोळी सरपंच कासम दलवाई यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर खड्डे भरण्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने 26 जानेवारी रोजी सरपंच दलवाई यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता.