
दरड कोसळून सुमारे 36 तास लोटले तरी बंद पडलेल्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत नाही
दरड कोसळून सुमारे 36 तास लोटले तरी बंद पडलेल्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत होऊ शकली नव्हती. कोसळलेल्या दरडीतील भलेमोठे दगड हटविण्याचे काम दुसर्या दिवशी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु होते.रविवारी सायंकाळी उशिरापर्यन घाटमार्ग सुरळीत सुरु झाला नव्हता. मात्र, रविवारी उशीरापर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्याबाबतचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.शनिवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर तसेच राजापूरला जोडणार्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आणि घाट मार्ग बंद पडला. त्यानंतर घाटातील दरड हटविण्याचे काम सुरु होते.