
शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकाच बोलायची सवय आहे”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.“शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकाच बोलायची सवय आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “आम्ही 115 तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडेबोल सुनावलं आहे. “भाजपने केसाने गळा कापू नये”, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं.www.konkantoday.com