भैयाशेठ दी ग्रेट
राजकीय चौकटीच्या बाहेर राहून, राजकारणातील अथवा संबंधित राजकीय पक्षाच्या कोणत्याही पदावर नसतांना आणि प्रशासकीय कोणत्याही मंडळ अथवा अन्य महत्त्वाच्या पदावर नसतांना अप्रत्यक्षपणे त्यांचे संचलन करणे. त्या प्रत्येक निर्णयात आपला महत्वाचा स्टेक ठेवणे एवढेच नाही तर तेथील प्रत्येक निर्णयात आपली निर्विवाद हुकमत प्रस्थापीत करणे याचे अभूतपुर्व श्रेयदार आणि हकदार म्हणून किरण सामंत उर्फ भैया शेठ यांची आज फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर तमाम महाराष्ट्राला ओळख आहे. रत्नागिरी आणि कोकणच्या राजकारणातील तसा हा बहुदा पहिलाच प्रसंग अथवा घटना असावी. त्यामुळेच रत्नागिरीचे लोकप्रिय आमदार मा. उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या झळाळत्या प्रकाशमान कार्यशैलीचा सन्मान करतांना त्यामागील चतुरस्त्र, मुत्सद्दी, विवेकी, संयमी आणि प्रसंगी विलक्षण आक्रमी ( हुक ॲार क्रुक ) अद्रृष्य सदैव सक्रिय पाठबळाचा विचार प्राधान्याने तर काही वेळा अतीप्राधान्याने केला जातो. याची प्रचिती किरण सामंत यांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेल्या विविध विशेषणातून येत रहाते . काही जणांसाठी ते थेट आमदार मंत्र्यांना भेटण्याचे आधार आहेत त्यामुळे कधी आधार, भैया दादा तर किंगमेकर या नावाने ते थेट मंत्रालय आणि राज्याच्या मंत्रिमंडळातही प्रसिध्द आहेत.
आज किरणजी यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणार्यांची भव्य मॅरेथॅान स्पर्धाच जणू रत्नागिरी शहराच्या नाक्या- नाक्यावर आणि प्रत्येक वळणावर जणू ओसंडून वहात आहे. हे भव्य फ्लेक्स वाहन चालकांचे लक्ष रस्त्यावर स्थिरांऊ देत नाहीत. वृत्तपत्रांच्या पानापानावरुन जाहिरांतींचे रकाने कोसळणार्या धबधब्यासारखे अंगावर येत रहातात. आजची सकाळ ही बातम्यांसाठी नव्हतीच जणू. त्यातही मोठी गंमत होती, किरणजीं सोबतच्या जाहिरातीत आपला फोटो ठळक येईल ना! याचा आटा-पीटा केवढा! यांतील प्रत्येकाला वाटत आहे. माझ्या दिलेल्या शुभेच्छा या किरणजींच्या लक्षात येंतील ना! त्याकडे साहेबांचे लक्ष जाईल ना! त्या पेक्षा गेलंच पाहिजे!
काळ किती वेगाने बदलत आहे आणि काळासोबत कोकणची मानसिकताही कसा वेगळ्या वळणावर नवे बदल स्वीकारत आहें. याची प्रचिती या निमित्ताने बदलत्या मानसिकतेचा आविष्कार विशद करणारी आहे. कोकणचा माणूस हा प्रेमळ शहाळ्याच्या गोडव्या सारखा पण थोडे हातचे राखून वागणारा, जवळच्या माणसाचे कौतूक करणे जरा अवघडच वाटावे त्यात ही एखाद्याच्या कर्तूत्वाची स्तूती करणे म्हणजे तर कडेलोट ! या पारंपारिक मानसिकतेतून चक्क बाहेर पडत स्तूती सुमनांची उधळण करु इच्छणार्या या बदलाचे स्वागतच केले पाहिजे. आणि याचे श्रेय किरणजींचेच .
गेल्या दिड दशकातील जिल्ह्याच्या राजकारणात किरणजी यांनी एक नवा प्रवाह प्रस्थापित केला तो राजकारण आणि कार्यकर्त्याची आर्थीकता यांचे नाते जोडण्याचा. खरं तर त्यांनी दिर्घ पल्याच्या राजकारणाची नस अचूकपणे हेरली असेच म्हणावे लागेल. नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे , सैन्य हे पोट भरल्यावरच लढते. ( An Army marches on its stomach) या प्रमाणे कार्यकर्त्याला रोजगारांची सांगड फार महत्वाची. एक महत्वाचे सत्ता केंद्र म्हणून आपले स्वतंत्र स्थान उभे करण्यात त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत करत नाही. आमदार खासदारांनाही काही वेळा जे शक्य होत नाही अशी अप्रत्यक्ष सत्ता आपल्या हाती खेचून आणणे हे फार अवघड आणि अशक्य असते मात्र किरणजी उर्फ भैयाशेठ या नावातच सारे येते म्हणूनच भैया शेठ दी ग्रेट!
किरणजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिजित हेगशेटये