उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस उत्साहात
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांचा वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाली येथील निवासस्थानी केक कापण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, वडील अण्णा सामंत, आई स्वरुपा सामंत यांच्यासह पत्नी, मुलगा, मुलगी व सामंत कुटुंबीय उपस्थित होते. रत्नागिरीतील कार्यालयामध्येही रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, नवी मुंबई, पुणे, बदलापूर येथील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यालयामध्ये शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होती. रत्नागिरी विधानसभा मतदार संघासह पाली, राजापूर व सिंधुदुर्गमध्येही विविध उपक्रम मित्र परिवाराने आयोजित केले होते. ग्रामीण भागात क्रिकेट, व्हॉलिबॉलच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकारी वर्गाने यावेळी उपस्थित राहून भैयाशेठ यांना शुभेच्छा दिल्या. दीर्घायुष्यासाठी मित्र परिवाराने मंदिरामध्ये प्रार्थना केली.