नाणीज मठात आलेल्या भक्ताचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
मधुकर दगडू टेंबे (५२, रा. लोणेरे, माणगांव, जि. रत्नागिरी) हे नाणीज येथील जुना मठ येथे पालखी सोहळ्याकरिता आलेले होते. त्यावेळी त्यांच्या छातीत व पाठीत दुखू लागले. त्यांना प्रथम नाणीज जुना मठ येथील खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता घेवून गेले असता त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता पाली ग्रामीण रूग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. www.konkantoday.com