साखरतर येथे गळफास घेत प्रौढाने केली आत्महत्या
रत्नागिरी : साखरतर येथे घरी गळफास घेत प्रौढाने आत्महत्या केली. याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री 8.45 वा. उघडकीस आली. मोज्जम फकीर मोहम्मद साखरतर (वय 50, रा. रहेबर मोहल्ला साखरतर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री 8.45 वा. त्यांनी स्टील पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेतला. नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलीस करत आहेत.