ऑनलाईन प्रक्रियेमुळे रास्त दर धान्यापासून राजापूर तालुक्यातीलग्रामीण भाग वंचित
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबीय आजही ऑनलाईनच्या नावाखाली रास्त दराच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महाळुंगे येथील सचिन पवार यांनी तहसीलदारांना निवेदन देत वंचित लाभार्थ्यांना रास्त धान्य मिळण्याची मागणी केली आहे. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रास्त दर दुकान चालक कार्ड ऑनलाईन नसल्याने धान्य मिळणार नसल्याचे सांगून मोकळे होत आहेत. रेशन दुकानदार नेहमी आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड झेरॉक्स घेतात. मात्र पुढे कार्यवाही होत नाही. शासनाने ग्रामीण परिस्थितीचा विचार करून आर्थिक दुर्बल कुटुंबाना रास्त धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे. www.konkantoday.com