
आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेवून पंधरा गावातील ३६६ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा.
मागील २० वर्षातील पूर व आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन येथील प्रशासनाने आर्याकालीन व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तालुक्यातील १५ गावात दरडी आणि पुराचा धोका असलेल्या ३६६ कुटुंबांना दरवर्षीप्रमाणे स्थलांतराच्या नोटिसा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यावुर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.www.konkantoday.com