
कसबा येथे ‘अजित पवारांना साक्षर करा’ आंदोलन
संगमेश्वर : छत्रपती शंभूराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्या अजित पवार यांनी माफी मागावी, अन्यथा भाजप त्यांच्या घरासमोर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांनी कसबा येथे दिला.
संगमेश्वर तालुका भाजपच्यावतीने अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कसबा येथील धर्मवीर संभाजी पुतळ्याजवळ ‘अजित पवारांना साक्षर करा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी जठार यांनी आपल्या सडेतोड शैलीत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे दरवर्षी 11 मार्चला याच ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष कोमल रहाटे, राजू भाटलेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम, रामदास राणे, संतोष केदारी, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, यशवंत गोपाळ, राजा गवंडी, विनोद म्हस्के, मिथून निकम, डॉ. अमित ताठरे, प्रसाद भिडे, तुकाराम किर्वे, रेश्मा किर्वे, राहुल फाटक, सुशांत मुळ्ये, मंदार गानू, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, पांडुरंग फाटक, पंढरीनाथ मोहिरे, भिडे, सुधीर यशवंतराव, प्रमोद शिंदे, धनंजय पाथरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.