
केमिकल चेहऱ्यावर उडाल्याने कामगार जखमी
खेड तालुक्यातील लोटेऔद्योगिक वसाहतीतील दीपक नवा केम कंपनीत फेनॉल केमिकलची गळती होऊन पिरलोटे येथील राहणारा अक्षय अरविंद खापरे हा जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. अक्षय हा गेली काही वर्षे कंपनीत कामाला आहे.तो रात्रपाळीच्या कामावर असताना लँडमधील फिनाल केमिकल्सची गळती झाली. त्यातील काही प्रमाणात केमिकल्स त्यांच्या चेहऱ्यावर उडाले त्यामुळे तो जखमी झाला ही घटना ग्रामस्थांना ग्रामस्थांना समजल्यानंतर ते संतप्त झाले त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
www.konkantoday.com