
रत्नागिरी एसटी बसस्थानकासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती
मागील काही वर्षे रगडलेल्या अवस्थेत असलेल्या रत्नागिरी एसटी बसस्थानकासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या कंत्राटदाराने योग्य रितीने काम केले नसल्याने बसस्थानकाचे काम रखडले होते. त्यामुळे आता नवीन कंत्राटदाराकडून चांगले काम करून घेतले जाईल, अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
शहराच्या मध्यभागी असलेले एसटी बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नव्याने बसस्थानक बांधण्यात येत आहे. मात्र मागील काही वर्षे हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे बसस्थानक लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याच्या कामाला कोणतीही गती आलेली नव्हती. एसटीची सध्याची वाहतूक ही रहाटाघर बसस्थानक या ठिकाणाहून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com