
भोस्ते घाटातील सतत होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अभियंत्यांनी संरक्षक भिंतीवर टायर तंत्रज्ञानाचा वापर केला
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने गतिरोधकांच्या संख्येत वाढ करूनही अपघात घडतच आहेत. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अभियंत्यांनी संरक्षक भिंतीवर टायर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संरक्षक भिंतीवर लावलेले मोठमोठे टायर अपघात रोखण्यासाठी कितपत उपयुक्त ठरतात, हेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
भोस्ते घाटातील अवघड वळण मृत्यूचा सापळा बनले आहे. चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. पूर्ण झालेल्या चौपदरीकरणावरून धावणार्या वाहनचालकांचा प्रवास वेगवान अन सुखकर होत असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. घाट उतरत असताना वाहनचालकांचा ताबा सुटून वाहने थेट संरक्षक भिंतीवर आदळून अपघात घडत आहेत.
www.konkantoday.com