पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याने गेल्या पाच महिन्यात आणखी २५ जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ अर्थसाहाय्य
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याने गेल्या पाच महिन्यात आणखी २५ जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ अर्थसाहाय्य मिळवून दिले आहे.१५ लाख ३७ हजारांची मदत देऊन या २५ कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणण्याचे मोलाचे सामाजिक काम उद्योग मंत्री सामंत यांनी केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये जास्त मेहनेत घेतली आहे ती त्यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांनी. त्यांनी या रुग्णांची आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यापासून प्रस्ताव पाठवण्यापर्यंत मदत केली आहे.
पालकमंत्री सामंत यांनी अनेकांना अडचणीतून सोडवण्याचे समाजिक काम केले आहे. अडचण घेऊन आलेला प्रत्येकजण समाधानी कसा होऊन जाईल यासाठी सामंत कुटुंबाची धडपड असते. यापूर्वी देखील गरीब गरजूंना घरासाठी मदत करणे, गंभीर आजारासाठी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत करणे अशी कामे त्यांनी केली आहेत; परंतु त्याबाबत कधीच कुठे जाहीर वाच्यता ते करत नाहीत. राज्याच्या मंत्रिमडंळात सामिल झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत व्हावी, त्यांना मोठ्या अडचणीतून सोडवता यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेकांची कामे केली
आहेत. आजवर हजारो रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी अर्थसाहाय्य केले आहे.
जुलै ते नोव्हेंबर २०२२ या पाच महिन्यात २५ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ अर्थसाहाय्य मिळवून दिले आहे.
www.konkantoday.com