
दापोली-खेड मार्गावर दुचाकी व ट्रक अपघातात ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू
खेड : दापोली-खेड मार्गावर सुकदर फाट्यानजीक मंगळवार दि.३रोजी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी व ट्रकची धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
श्री दिवेकर (पूर्ण नाव समजू शकले नाही) हा आपल्या ताब्यातील दुचाकीवर वैभव शिगवण ( वय २७, रा. भरणे बाईतवाडी ) याला घेऊन वाकवली येथून खेडच्या दिशेने येत होता. दुपारी सुकदर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक ( एम एच ०४ जी एफ ८५२०) सोबत दुचाकीची धडक झाली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला वैभव शिगवण ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघाची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत खेड पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.