सुकिवली चव्हाणवाडी येथे दुचाकींच्या धडकेत स्वार गंभीर जखमी

खेड :  सुकिवली कर्टेल रस्त्यावर चव्हाणवाडीजवळ शनिवारी दि. 31 रोजी दुपारी 2 च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही स्वार जखमी झाले. शनिवार दि.31 रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास तालुक्यातील सुकिवलीहून कर्टेलकडे सुनील तुकाराम यद्रे हा अ‍ॅक्टीव्हा दुचाकी ( एमएच 43 एके 7142) घेऊन जात होता. त्याचवेळी कर्टेलहून सुकिवली गावाकडे राजेंद्र विलास चौगुले हा दुचाकी (एमएच 08 क्यू1964) घेऊन जात होता. दोन्ही दुचाकी सुकिवली कर्टेल रस्त्यावर धावत असताना चव्हाणवाडी थांब्याजवळ दोन्ही दुचाकीस्वारांचा दुचाकीवरील ताबा सुटून दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात सुनील तुकाराम यद्रे (42) व राजेंद्र विलास चौगुले (40) हे दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाणीज संस्थानच्या रूग्णवाहिकेतून चालक सुरज हंबीर याने कळंबणी रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button