
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या कोंढेतड-उन्हाळे रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरूच
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या कोंढेतड-उन्हाळे रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरू असताना याकडे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यासाठी मनुष्यहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे. सोमवार नंतर बुधवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा एक ट्रक पलटी झाला. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कांेंढेतड-उन्हाळे रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत.
www.konkantoday.com