
रामपूर आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची वानवा
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत रामपूर, चिवेली, बामणोली, बोरगाव, मजरे कौंढर, लोणारी, वाघिवरे, कौंढरताम्हाणे, मार्गताम्हाणे खुर्द, मार्गताम्हाणे बुद्रूक, कळमुंडी, उमरोली, डुगवे, तनाळी, उभळे, बिराटगाव, आंबेरे, शिरवली, मिरवणे, देवखेरकी, पाथर्डी, गुढे, डुगवे, कात्रोली, कुंभारगाव २६ गाव येतात. याशिवाय गुहागर तालुक्यातील कुटगिरी, पाभरे, पाली येथे रूग्णही रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येतात. चिपळूण गुहागर तालुक्यांना जोडणारे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुंढे, डॉ. निकिता शिर्के यांची अहोरात्र रूग्णांसाठी सेवा चालू असते. एप्रिल ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण ७ हजार ९९८ रूग्ण तपासणी करण्यात आली. परंतु कर्मचार्यांची वानवा असल्याने आरोग्य सेवा देताना अधिकार्यांवर ताण येत आहे.
अधिकारी रूग्णांना सेवा देतात, रामपूर प्रा. आ. केंद्र बोर्डावर ग्रामीण रूग्णालय असा उल्लेख करण्याची आवश्यकता आ. भास्कर जाधव यांनी सतत प्रयत्न करून आरोग्य मंत्रालयाकडून रामपूर ग्रामीण रूग्णालय मंजुर केले, परंतु अद्यापही रत्नागिरी आरोग्य विभागाकडून ग्रामीण रूग्णालय असा बोर्डवर उल्लेख नाही. रामपूर ग्रामीण रूग्णालयात कर्मचार्यांची कमतरता आहे. www.konkantoday.com