कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांची परवड, शासनाची वेबसाईट अनेक महिने बंद
चीन चीनसारख्या देशात आता करोना पुन्हा सुरू झाल्याने सर्व देशात खबरदारीचे उपाय सुरू आहेत
यापूर्वी आलेली कोरोनाची महामारी संपल्यानंतर सगळ्याच गोष्टी सुरळीत झाल्या. मात्र कोरोनाच्या शेवटच्या टप्प्यात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांची परवड मात्र अद्यापही संपलेली नाही. कोरोना काळात दगावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेली शासनाची वेबसाईट अनेक महिने बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकजण या मदतीपासून वंचित राहिले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे आणि आता सर्वांचेच या सगळ्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे नातेवाईकांना मात्र सतत प्रशासनाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
कोरोना काळ हा सर्वांसाठीच खूप कठीण काळ होता. या काळात अनेक कुटुंबानी आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमावली होती. अनेक मुलांनी आपल्या दोन्ही पालकांना गमावले होते. या कठीण काळात कोलमडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनाने ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीने मदत देण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र २०२० च्या दरम्यान कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. शासनाने अशा व्यक्तींकरिता वेबसाईट सुरू केली होती. मात्र गेले कित्येक महिने ही वेबसाईट बंद आहे. २०२० मध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी या वेबसाईटवर माहिती भरूनही अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. पुन्हा आपली माहिती या शासकीय पोर्टलवर भरण्यासाठी आता हे पोर्टलच बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. www.konkantoday.com