मालगुंड येथे होणार्‍या सुमारे ७५ कोटींच्या या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या झू ऍथॉरिटी समितीने तत्वतः मान्यता दिली

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्राणीसंग्रहालयाच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. तालुक्यातील मालगुंड येथे होणार्‍या सुमारे ७५ कोटींच्या या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या झू ऍथॉरिटी समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. यामधील किरकोळ त्रुटी दूर केल्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. संग्रहालयासाठी नियुक्त केलेल्या जेमिसन कन्सल्टन्सीचे पदाधिकारी जितेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून १५ हेक्टर जमिनीवर हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मंत्री सामंत या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात पर्यटनवाढीला मदत होणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वारंवार त्याचा पाठपुरावा सुरु आहे. प्राणीसंग्रहालय उभारणीसाठी जी कन्सल्टन्सी कंपनी आहे त्या जेमिसन कन्सल्टन्सीचे जितेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला.
यापूर्वी आरेवारे परिसरातील जागा निश्‍चित करण्यात आली होती परंतु सीआरझेडसह पर्यावरण विभागाच्या अनेक अडथळ्यांमुळे प्रकल्पाची ती जागा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वनविभागासह संबंधित विभागाने अनेक ठिकाणच्या जागांची पाहणी केली. तेव्हा मालगुंड येथील १५ हेक्टर जागा निश्‍चित करण्यात आली. केंद्र शासनाने प्राणी संग्रहालय उभारण्याच्यादृष्टीने पहिला हिरवा कंदिल दाखवला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button