जगबुडी नदी कचऱ्यात डुबली आता असती विसर्जनही लोक टाळू लागले
खेडमधील जगबुडी नदीत टाकण्यात येणाऱ्या कचराबाबत अनेक वेळा आवाज उठवणे त्यात कोणतेही सुधारणा झालेली नाही त्यामुळे या नदीत पूर्णपणे कचरा पसरला आहे कचर्याने व्यापल्यामुळे या नदीत गुरूवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अस्थी विसर्जनासाठी आलेल्या कुटुंबियांनी या नदीची अवस्था पाहून या नदीत अस्थी विसर्जन करणे टाळले . या कुटुंबियांनी अन्य ठिकाणी अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे नदीची नेमकी किती वाईट अवस्था झाली आहे हे पहायला मिळाले.
जगबुडी नदी सध्या कचर्याने व्यापली आहे. नदीपात्रावर कचर्याचा थर जमा झाला आहे. बाटल्या तसेच टाकाऊ कचर्याने नदीचे पात्र अक्षरशः दिसेनासे झाले आहे. त्यातच एक कुटुंब या नदीत अस्थी विसर्जनासाठी गणेशघाट या ठिकाणी आले होते. लांबूनच म्हणजे घाटाच्या वरूनच नदीवर तरंगणार्या कचर्याचे ढीग पाहिल्यावर त्या कुटुंबियांनी देहावसान झालेल्या आपल्या नातेवाईक व्यक्तीच्या अस्थी या नदीत विसर्जन करण्यास तयार झाले नाहीत. ही घटना प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्या नागरिकांनी नदीच्या अवस्थेबद्दल खंत व्यक्त केली. www.konkantoday.com