खेड शहरात भरणे येथेआढळला दुर्मिळ व्हिटेकर बोआ जातीचा साप

खेड शहरातील भरणे येथे एका घरामध्ये २७ डिसेंबर रोजी रात्रौ १० च्या सुमारास साप आल्याची बातमी छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या प्राणीमित्रांना मिळाली, तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्पमित्र युवराज मोरे यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या पकडले. त्या सर्पामध्ये काही वेगळेपणा जाणवल्याने युवराज मोरे यांनी कोल्हापूरमधील प्राणीमित्र व वन्यजीव अभ्यासक आशुतोष सुर्यवंशी यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्प व्हिक्टेकरी बोआ जातीचा असून १९९१ मध्ये सर्प संशोधक इंद्रनील दास यांनी या नवीन प्रजातीचा शोध लावला आणि भारतीय उपखंडातील हर्पेटॉलॉजिमध्ये दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे रोमूलस व्हिटेकर यांचे नाव या प्रजातीस दिले गेले. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सापाच्या संशोधनामध्ये घालवले त्यांच्या नावाने हा साप ओळखला जावा म्हणून त्याच्या गौरवार्थ या सापाला त्यांचे नाव देण्यात आले. म्हणून त्याला व्हिटेकरी बोआ असे म्हणतात. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button