
बॅरियर्स नसल्याने हातिवले येथे महामार्गावर मोठ्या संख्येने गुरे रस्त्यावर, अपघातांची भीती
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तालुक्यातील काही भागात अपूर्ण असताना टोलवसुलीची घाई महामार्ग प्राधिकरण करीत असल्याचे नुकतेच पुढे आले होते. प्रचंड जनरेट्यामुळे टोलवसुलीला स्थगिती मिळाली असली, तरी रस्त्याच्या कामात अद्यापही अनेक त्रुटी दिसत असून सुविधांचा अभाव जाणवत आहे. हातिवले येथे अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून क्रॅश बॅरिअर्स न बसविल्याने शेतकर्यांची गुरे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com