सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ : मुख्याध्यापक किशोर लेले
रत्नागिरी : सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. मागील काही वर्षे कोरोना काळात हे कार्यक्रम होऊ शकले नाहीत, आता हे कार्यक्रम होत आहेत, त्यांचा आनंद घ्या, असे प्रतिपादन फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यवेक्षक झोरे सर, देवरुखकर सर, सावर्डेकर सर, आखाडे सर, बनगर सर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवरुखकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले. 3 दिवस या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.