पर्यटकांसाठी एसटीची रत्नागिरी दर्शन सेवा

रत्नागिरी : नववर्ष स्वागतासाठी रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांच्या सेवेसाठी एसटी विभागाने  खास बससेवा सुरू केली आहे. दि. 28 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान रत्नागिरी दर्शन बसफेरीमधून रत्नागिरी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांना  भेट देता येणार आहे. ही गाडी दररोज सकाळी 8 वाजता रत्नागिरी बसस्थानकावरून सुटेल.  आडिवरे, कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे या ठिकाणांची सफर घडवणार  आहे. सायंकाळी 7 वाजता ही बस पुन्हा आरेवारे मार्गे रत्नागिरी बसस्थानकात पोहोचणार आहे. या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीट दर प्रौढांसाठी 300 रुपये आणि लहान मुलांसाठी 150 रुपये आकारण्यात येणार आहे. एसटीच्या या रत्नागिरी दर्शन फेरीमुळे पर्यटकांना एका दिवसात रत्नागिरी आणि राजापुरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक, मोबाईल नंबर 7588193774 आणि स्थानक प्रमुख, मोबाईल 9850898327 या क्रमांकावर संपर्क साधावा.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button