पाली येथे दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा
रत्नागिरी : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि संजीवन दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मेळावा रविवारी (२५ डिसेंबर २०२२ रोजी ) लिंगायत मंगल कार्यालय पाली येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी महसूलचे अधिकारी मिलिंद देसाई, नायब तहसीलदार श्रीम. माधवी कांबळे, श्री. सागर शिंदे, श्री. परिमल डोर्लेकर, श्री.सुमित कोळंबेकर , श्री. स्वप्नतेज मयेकर, श्री. चौगुले (खानु तलाठी), श्री.शिवलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या आनंद मेळाव्याअंतर्गत दिव्यांगाना पेंशन योजनेचेफॉर्म भरण्यात आले, आधार कार्ड अपडेट, आधार कार्ड kyc मतदान आधार कार्ड लिंक करणे असे विविध दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न, समस्या जाणून घेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या मेळाव्याला ३०० ते ३५० दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती. राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांगांच्या मागण्या मांडल्या. यामध्ये दिव्यांगांना व्यवसायासाठी मोफत २०० चौरस फूट जागा त्वरीत वितरीत करावी, तुटपूंज्या पेन्शन ऐवजी ती भरीव रक्कम द्यावी व २५ वर्ष मुलाची अट रद्द करावी, दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करून दिव्यांगांना मोफत कृत्रीम साहित्य त्वरीत यावे, जिल्हा-तालूका व ग्रामस्तरावर समाज मंदीरच्या धर्तीवर दिव्यांग भवन बांधावे, प्रत्येक दिव्यांग बांधवाचे अंत्योदय योजनेत नांव समाविष्ठ करावे व ३५ कीलो धान्य मिळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी संजीवन विकास संस्थेचे अध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष इम्रान साटविलकर, सचिव नंदकुमार कांबळे, तसेच राखी कांबळे, आकाश कांबळे, गणपत ताम्हणकर, प्रकाश कदम, संजय कदम सचिन सावंत, कामना कांबळे, मनोज सावंत, ऋषिकेश परपटे, विजय कदम आदी उपस्थित होते.