दापोली विरसाई येथे दारू पिऊन शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यामधील वीरसाई कोळवाडी येथे दारू पिऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी राजेश निर्मळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश निर्मळ याने 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन नारायण रेवाळे यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. या शिवीगाळ प्रकरणाची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीनुसार रेवाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक गावडे करीत आहेत.