साहेब.….
साहेबांबद्दल जेवढे व्यक्त व्हावे तेवढे कमीच आहे…
साहेब एक आदर्श व्यक्तीमत्व
साहेबांचा वाढदिवस ही आमच्यासाठी एक पर्वणी म्हणजे एक प्रकारचा आनंद सोहळाच असतो…त्या दिवसाचे वेध कितीतरी दिवस आधी लागतात कारण तो दिवस साहेबांच्या सानिध्यात रहायला मिळते…
त्यांची माया स्नेह प्रेम आपल्याला कायमच काहीतरी देतच राहते..पण तो एकच दिवस असा असतो की आपल्याला थोडे तरी काही तरी त्यांच्यासाठी करता येते.
मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या सोबत काम करत आहे,युवक संघटनेमधील त्यांचे सुरवातीचे काम तर संपूर्ण जिल्ह्यात युवकांमध्ये नव चैतन्य आणणारे होते.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक राजकारणाच्या प्रवाहात आले नुसते आले नाहीत तर आज अनेक जण यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत पण खरं सांगायचं झाल्यास सुरवातीच्या कालावधीत या युवकांना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली ती उदयजी सामंत यांनीच आणि ही युवकांची दमदार फळी नुसती जिल्ह्या पुरती नव्हती तर संपूर्ण महराष्ट्रात उभी राहिली 1999 ते 2004 च्या कालावधी मधील ही युवक फळी राज्याच्या राजकारणात महत्वाच्या पदांवर कार्यरत आहे आणि त्यातील सर्वच उदयजी सामंत यांच्याशी घट्टपणे आजही जोडून आहे.
गेल्या 18 वर्षाचा त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास हा अत्यंत रोमांचक आणि थक्क करणारा आहे.. उत्कृष्ट युवा नेतृत्व म्हणून उदयजी सामंत साहेबांकडे बघितले जाते कारण राजकारणात महत्वाचे असते कार्यकर्ता जपणे….कार्यकर्ते जपले की आपोआप कार्यकर्ते नेतृत्व जपतात…साहेबांनी नुसते कार्यकर्ते जपलेच नाही तर त्यांना उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून घडवले.
या 18 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये उदय सामंत यांनी अनेक आव्हाने लीलया पेलली आहेत.म्हणून आज त्यांच्याकडे अखंड महाराष्ट्र एक संयमी आणि विचारी नेतृत्व म्हणून पाहतो. कोविड च्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग चे पालकमंत्री जरी असले तरी त्यांनी या संकटामध्ये
रत्नागिरीकडे सुद्धा जातीने लक्ष दिले.
संकटाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली निर्णय क्षमता महत्त्वाची असते आणि या संकटात त्यांची निर्णय क्षमता दिसून आली.दोन्ही जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक लॅब उभ्या राहिल्या…अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट उभे राहिले.. शासकीय रुग्णालयात अतिरिक्त बेड उपलब्ध झाले..जिल्हा प्रशासनाशी वारंवार बैठका घेऊन परिस्थतीचा आढावा घेत होते.
गरज पडल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्रत्येक काम शक्य तितक्या लवकर करण्यासाठी आग्रही भूमिका घेत होते.
संकटात संयमाने प्रशासकीय यंत्रणा कशी हाताळायची हे नामदार उदय सामंत यांनी दाखवून दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना या कोविड च्या कठीण कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली होती.
विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना प्रसंगी राज्यपाल आणि कुलगुरू यांच्या सोबत तात्विक वाद देखील झाले.शेवटी शासनातील एक जबाबदार पदावर काम करत असताना राज्यातील बहुसंख्य विदयार्थी वर्ग ,त्यांचे पालक हे उदय सामंत यांच्याकडे कोविडच्या संकटातून आपल्या सर्वांना बाहेर काढणारा तारणहार म्हणून पाहत होता.त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयामुळेच सोशल मीडियावरून आपला माणूस,देव माणूस अशा उपाधी देखील मिळाल्या. संकटात मुलांसाठी online परीक्षेचे निर्णय घेतले असले तरी कोविडच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी offline परीक्षा होणार आणि तुम्ही त्याला सामोरे जा हे देखील त्यांनी विदयार्थी वर्गाशी संवाद साधताना अनेकदा सांगितले.
आज पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण खात्याला एवढं लोकाभिमुख कोणीही केलं नव्हतं ते केवळ झालं उदय सामंत यांच्यामुळेच. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच,प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न असोत वा विद्यापीठांचे,ते तात्काळ मार्गी लागले.राज्याच्या इतिहासात प्रथमच उच्च तंत्र शिक्षण मंत्री विद्यापीठात जाऊन प्रश्न सोडवणारे म्हणून त्यांची लोकप्रियता झाली.
राज्याचा कारभार चालवत असताना त्यांनी रत्नागिरी कडे कधीच दुर्लक्ष केलं नाही.आपली रत्नागिरी शैक्षणिक हब कशी बनेल यासाठी निर्णय घेतले.
आज रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज,संस्कृतचे उपकेंद्र ,बी फार्मसी या सारखी शिक्षणाची दालने सुरू झाली आहेत.
त्यांनी जे तारांगण चे स्वप्न पाहिले होते ते आज सुरू झालंय.मारुती मंदिर सर्कल हे शिवसृष्टीमय झाले हे निव्वळ त्यांच्यामुळेच..
उदय सामंत यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी शब्द अपुरे पडतील.
आज उद्योगमंत्री म्हणून काम पाहत असताना रत्नागिरीतील बंद पडलेले 2 आजारी उद्योग पुन्हा सुरू होणार आहेत ते केवळ उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्यामुळेच.इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आजारी उद्योग सुरू करण्यासाठी एखादा इन्व्हेस्टर पुढे केव्हा येतो जेव्हा त्याला सुप्रीम पॉवर कडून शाश्वती मिळते.त्याचा पक्का विश्वास बसतो तेव्हाच !! आज उदय सामंत यांच्या सारख्या खंबीर नेतृत्वामुळेच गुंतवणूकदारांना विश्वास मिळत आहे की त्यांना पाठबळ मिळेल ते केवळ उदय सामंत या नेतृत्वाकडूनच..गुंतवणूक दारांची पावलं आपल्याकडे वळत आहेत आता आपणही त्यांचे सकारात्मक राहून स्वागत केले पाहिजे.जिल्ह्यात मोठे उदयोग आले तर रोजगार वाढेल,व्यापार वाढेल,इकॉनॉमि वाढेल या साठीच आपण सर्वांनी देखील नव्या उद्योगांचे स्वागत केले पाहिजे.
हल्ली सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रत्येक जण फक्त आपल्या शहरातील आपल्या गावातील negativity शोधत असतो…पण प्रत्येक गोष्ट सुधारण्यासाठी थोडा वेळ हा निश्चितच लागणार आहे.साहेबांकडे अल्लाउद्दीन चा जादुई दिवा नाही की ज्याने सर्व चमत्कार एका रात्रितच होतील.
प्रत्येक काम करताना सर्व बाजूंनी अडचणी असतात त्या सर्वांवर विचार करून व्यवस्थित मार्ग काढून ती गोष्ट करावी लागते.
गेल्या 18 वर्षाचा आढावा बघितल्यास आपण निश्चितच विकासाच्या दिशेने चालतोय…फक्त गरज आहे ती थोड्या संयमाची आणि पूर्ण विश्वासाची.
मनोज मधुकर साळवी
रत्नागिरी