रत्नागिरीत दारूच्या नशेत दुचाकी चालवून रस्त्याकडेला उभ्या असणार्या दुचाकींना धडक; दोघे जखमी
रत्नागिरी : रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री शिवाजीनगर बसस्टॉपजवळ घडली. दारुच्या नशेत बेदरकारपणे दुचाकी चालवत हा अपघात केला. यात एक महिला आणि तिचा पुतण्याही जखमी झाला. याप्रकरणी ओंकार सुधाकर पालांडे (वय 34, रा. खेडशी गयाळवाडी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पोलिस हे. काँ. लक्ष्मण कोकरे यांनी तक्रार दिली आहे. 18 डिसेंबर रोजी रात्री ओंकार आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एझेड-0652) घेऊन साळवी स्टॉप ते मारुती मंदिर असा येत होता. त्याच सुमारास सुमया मुबीन होडेकर या दुचाकी (एमएच-08-टी-4762) वर त्यांचा पुतण्या मोहम्मद मुदस्सर होडेकर आणि मुबीन हिदायत होडेकर हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएफ-7343) वर शिवाजीनगर येथील बसस्टॉपजवळ फोनवर बोलत थांबले असताना हा अपघात झाला.