
निवळी येथे ट्रक अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : दारुच्या नशेत ट्रक चालवताना ताबा सुटल्याने उतारात मागील ट्रकवर आदळून अपघात केला. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी – रांभोळकरीन देवस्थानच्या समोरील रस्त्यावर ही घटना गुरुवार 22 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वा. घडली. याप्रकरणी किरण रावसाहेब पवार (वय 29, रा. बार्शी, सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.