
खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी जादा भाडे आकारले तर गुन्हा दाखल करणार -ना. उदय सामंत
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांना घेऊन येणार्या खाजगी वाहन चालकांकडून अवास्तव भाडे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. एसटी पेक्षा दीडपट भाडे आकारण्याची मुभा खाजगी वाहन चालकांना आहे मात्र त्यापेक्षा जास्त भाडे आकारून चाकरमान्यांना लुटणार्या वाहन चालकांवर मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाई करतानाच पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com