रत्नागिरी आठवडा बाजारातून दुचाकीची चोरी
रत्नागिरी : आठवडा बाजार येथून दुचाकी लांबवण्याची घटना 19 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार विश्वनाथ साळवी (वय 31, रा. फणसोप, रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. त्यांनी आपली दुचाकी (एमएच-08-टी-5832) नवलाई ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये पार्क केली होती. दुसर्या दिवशी त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.