
रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणार्या ग्रामपंचायतीत रणधुमाळीला प्रारंभ
रत्नागिरी जिल्ह्यातील १४ सार्वजनिक ग्रामपंचायती व १३४ ग्रामपंचायतींमधील १७१ रिक्त सदस्य पदांसाठी तसेच ३ थेट सरपंच रिक्त पदांसाठीच्या निवडणुकांची रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचार संहिता लागू राहिल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी दिली आहे. या निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड तालुक्यातील तोंडली, उन्हवरे आणि वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डोली, मांदिवली, कवडोली आणि बांधतिवरे, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बु., कालुस्ते खु. व टेरव, गुहागर तालुक्यातील असगोली, संगमेश्वर तालुक्यातील ओझरे बु. व तळेकांटे तर राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर अशा १४ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
www.konkantoday.com