माय-लेकींनी लढवली निवडणूक : ठाकरे गटाची आई जिंकली… शिंदे गटाची मुलगी हरली

गुहागर  : तालुक्यामध्ये  आरे-वाकी-पिंपळवट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मध्ये आई विरुद्ध मुलगी रिंगणात उतरली होती. यामुळे या माय-लेकींच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर मतमोजणीनंतर आईनेच या निवडणुकीत बाजी मारली आणि आपल्याच लेकीचा तब्बल 50 मतांनी पराभव केला.
 प्रभाग क्र. 1 मध्ये आई सुवर्णा दिनानाथ भोसले यांच्या विरूद्ध त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर या निवडणूक लढवत होत्या.  मतमोजणीवेळी आई सुवर्णा भोसले यांना 282 तर मुलगी प्राजक्ता देवकर यांना 232 मते मिळाली. आई ठाकरे गटाकडून तर मुलगी शिंदे गटाकडून निवडणूक लढवित होती. या लढतीमध्ये माय-लेक समोरासमोर लढत होत्या. अखेर या राजकारणात आई वरचढ ठरली आणि राजकीय पटलावर मुलीचा पराभव झाला. या निकालानंतर विजयी उमेदवार सुवर्णा भोसले म्हणाल्या, या लढतीला माय-लेकीची लढत म्हणू नका. ही निवडणूक होती. आम्ही या नात्यावर निवडणूक लढवली नाही तर आम्ही केलेली विकासकामे, आ. भास्कर जाधव यांचे पाठबळ, त्यांनी केले काम यावरच ही निवडणूक आम्ही जिंकलो आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button