चिपळूण तालुक्यात सेना, राष्ट्रवादीची सरशी
चिपळूण : शिंदे गटाला चिपळूण तालुक्यामध्ये खाते उघडता आलेले नाही. शिरगाव, असुर्डे, परशुराम, आंबतखोल, केतकी, खांदाटपाली, तर गुहागर मतदारसंघातील नारदखेरकी, ओमळी, गोंधळे, डुगवे, ढाकमोली, आबीटगाव, वहाळ, बामणोली, गुळवणे या ठिकाणी शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादीने कळकवकणे, नवीन कोळकेवाडी, पेढे, भिले, तर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील तुळसणी, किरडुवे, माखजन, आंबव-पोंक्षे, फणसट मराठवाडी, तुरळ या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे.तालुक्यात 32 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी 12 ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. त्यापैकी गाणे येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने येथील निवडणूक होऊ शकली नाही तर उर्वरित 19 ग्रा.पं.साठी मतदान होऊन निकाल जाहीर झाला. तालुक्यात ठाकरे गट शिवसेना व राष्ट्रवादी वरचढ ठरली आहे.
तालुक्यातील 19 ग्रा. पं. निवडणुकीची मतमोजणी येथील पंचायत समिती कार्यालयात तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. तालुक्यात शिरगाव व पेढे येथील ग्रा.पं. निवडणूक निकालाकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शिरगाव सरपंचपदी नीता शिंदे यांनी 1 हजार 118 मते मिळवून एकतर्फी विजय मिळविला. त्यांच्या विरोधातील श्रद्धा शिंदे यांना 800 मते मिळाली तर मनिषा पवार 327, ऋषाली शिंदे यांना 164 मते मिळाली. यामध्ये ठाकरे गटाने एकतर्फी विजय मिळविला आहे. या ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीचे प्रवीण सावंत, नीलेश कोलगे, ऋतुजा बागडे, वैष्णवी शिंदे व निशा पाचकले हे पाच उमेदवार विजयी झाले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या श्वेता शिंदे, फातिमा शिकलगार व उमेश चिपळूणकर विजयी झाले. अपक्ष म्हणून प्रशांत सोलकर तर बिनविरोध वृषाली जाडे व प्रणिता गोवळकर यांनी विजय मिळविला आहे.
तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडल्याने यावेळी या पदाला महत्त्व देण्यात आले होते. ग्रा. पं. निहाय सरपंचपदाचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. नवीन कोळकेवाडी -अनंत सुर्वे (165). नारदखेरकी – गणपत आंबवकर यांनी बाजी मारली. त्यांनी रघुनाथ चाळके यांच्यावर 107 मतांची आघाडी घेत सरपंचपद पटकावले. या ठिकाणी पंचरंगी लढत झाल्याने अनिल जाधव यांचा पराभव झाला. केतकी ग्रा.पं.मध्ये महेंद्र भुवड 299 मते मिळवून विजयी झाले. अनंत भागणे यांना 147 मते मिळाली. करंबवणेमध्ये दत्ताराम शिंदे 83 मतांनी विजयी होऊन सरपंच झाले.
कळकवणे येथे सविता निकम या 426 मते मिळवून एकतर्फी सरपंच म्हणून निवडून आल्या.
गुळवणे येथे श्रीकृष्ण घाग यांनी 138 मते घेत सरपंच म्हणून विजय मिळविला. गुढे येथे दुरंगी लढतीत किशोर गांधी यांनी 272 मते घेतली तर केदार जोगळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. गोंधळे येथे भूषण खेडेकर यांनी 465 मते घेत विजय मिळविला. विरोधी उमेदवार संतोष गोंधळेकर यांना 316 मते मिळाली. ढाकमोली येथे भारती लाड 202 मते मिळवून विजयी झाल्या तर सुजाता लाड यांना 115 मते मिळाली.
परशुराम येथे गायत्री जोंधळे व मोहिनीतालुक्यातील बहुचर्चित पेढे ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादीने सरपंचपद राखले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध सेनेमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या अरूषी शिंदे यांना 977 तर शिवसेनेच्या मानसी भोसले यांना 966 मते मिळाली. सौ. शिंदे यांनी 10 मतांची आघाडी घेत सरपंचपद पटकावले आहे. या ठिकाणी दुरंगी कडवी लढत पाहायला मिळाली. खळे यांच्यात जोरदार संघर्ष झाला. गायत्री जोंधळे यांचा 20 मतांनी विजय झाला. पेढे येथे आरूषी शिंदे यांचा दहा मतांनी विजय झाला. आरूषी शिंदे यांना 977 मते मिळाली. शिरगावमध्ये निता शिंदे यांनी 1 हजार 118 मते घेत एकतर्फी विजय मिळविला. वहाळमध्ये जोरदार संघर्ष झाला. मंगेश शेलार हे 484 मते मिळवून विजयी झाले तर विरोधी उमेदवार शंकर कदम यांना 430 मते मिळाली. ओमळी येथे प्राजक्ता जाधव 549 मते घेत विजयी झाल्या. आबीटगावमध्ये सुहास भागडे 506 मते घेत विजयी झाले.
असुर्डेमध्ये पंकज साळवी यांचा 703 मते घेत एकतर्फी विजय झाला. बामणोली येथे चौरंगी लढतीत सुरेश गमरे यांनी 264 मते घेत विजय मिळविला. भिले येथे आदिती गुढेकर यांनी 421 मते घेत विजय मिळविला तर भूमिका गुढेकर यांना 277 मते मिळाली.