कारवांचीवाडी येथे नेपाळी तरुणाने घेतला गळफास
रत्नागिरी : कारवांचीवाडी येथे नेपाळी तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेतला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री 11.30 ते 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वा. कालावधीत घडली आहे.राजेंद्र बहादूर घर्तीमगर (35, मूळ रा. नेपाळ, सध्या कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे त्याचे ना व आहे. राजेंद्र हा त्याच्या अन्य 15 सहकार्यांसह नेपाळहून 13 डिसेंबरला रोजंदारीसाठी देवगडला जाण्यासाठी आला होता. 18 डिसेंबरला ते सर्व नेपाळी हातखंबा येथे आले. तिथून देवगडला जाणारी गाडी न मिळाल्याने ते सगळे कारवांचीवाडी येथे उतरले. रात्री 9.30 वा. त्याठिकाणी चायनीज खाऊन बाजूच्या मोकळ्या जागेत झोपी गेले. पहाटे 4.30 वा. सुमारास त्यांच्यातील एकजण लघुशंकेसाठी उठला असता त्याला राजेंद्र घर्तीमगर हा झाडाला चादरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला.